Krushi Sevak Bharti 2023 Best | कृषिसेवक भरतीमुळे योजना शेतकऱ्यांना बांधावर! 2109 पदांची भरती जाहीर

Krushi Sevak Bharti 2023: नमस्कार आपल्या भारत देश हा एक नवयुका युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. पण आपल्या देशामध्ये आता सध्या नोकरीन मिळाल्यामुळे सुशिक्षित बेरोजगारी वाढली आहे. यासाठी भारत सरकार व व राज्य सरकार या सुशिक्षितांसाठी नवनवीन नोकरीच्या संध्या उपलब्ध करून देत असते.

तर अशीच एक आणखी नोकरीची संधी ही नवयुवकांसाठी चालून आलेली आहे. तर आपल्या राज्य सरकारने कृषी विभागामामध्ये कृषी सेवकांची भरती करण्याची निश्चित केले आहे. ही भरती तब्बल 2109 पदांसाठी जाहीर झालेली आहे. तरी या भरतीचा अर्ज कधीही कोठे आणि कसा करायचा आहे. याविषयी आपण या लेखांमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी हा लेख सविस्तर वाचा. (Krushi Sevak Bharti 2023)

Krushi Sevak Bharti 2023

आपला भारत देश हा एक कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो यामध्ये शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणी येत असतात. त्यासाठी आपले कृषी सेवक हे वेळोवेळी शेतकऱ्यांना मदत करत असतात. मी प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांची मदतीसाठी हे धावून येत असतात. शेतकऱ्यांना नवनवीन योजना चे माहिती पुरवणी किंवा शेतीविषयक असलेल्या काही गोष्टींविषयी सल्ला देणे. हे या कृषी सेवकांचे काम असते. तर याच कृषी सेवकांची आता राज्य सरकार मार्फत भरती होणार आहे. तरीही कोणत्या जिल्ह्यासाठी किती पदे असणार आहे. की हे आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी खालील माहिती वाचा.

Krushi Sevak Bharti 2023
Krushi Sevak Bharti 2023

कृषी सेवक भरती

विभागाकडे कृषी सल्लागारांची कमतरता असल्याने सर्व शेतकऱ्यांपर्यंत कृषी सेवक हे पोचू शकत नाही. त्यासाठी राज्य सरकारने तब्बल 2109 कृषी सेवकांची भरती करण्याचे निश्चित केले आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यात 336 पदी पदे भरली जाणार आहेत. कृषी सेवकांचे काम हे शेतकऱ्यांना योजना समजावून सांगणे किंवा पीक व्यवस्थापनाचे मार्गदर्शन करण्यासह पिकावर कीटकनाशके कोणती वापरावी. किंवा लागवड करताना बियाणे कोणते लावावे. (Krushi Sevak Bharti 2023)

खताचा पूर्ण व्यवस्थापन कसे करायचे. हे सर्व कृषी सहाय्यक आपल्या क्षेत्रामध्ये सर्व शेतकऱ्यांना सांगत असतात. एवढेच नाही तर जर काही योजना आल्या असतील आणि त्यामध्ये जर कृषी सेवक हे त्यांचा मोलाचा वाटा असतो. कारण शेतकऱ्यांना या योजनेविषयी कागदपत्रे या योजनेचा लाभ कसा मिळेल. व या योजनेचा निधी वेळेपर्यंत हे कृषी सहाय्यक आपल्या शेतकरी मित्रांना मदत करत असतात.

शेतकऱ्यांचा सल्लागार आणि शेतकरीमित्र

शेतकऱ्यांचा सल्लागार आणि शेतकरीमित्र असलेल्या कृषिसेवकामुळे शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजना, सल्ला अन् पीक व्यवस्थापन कळते. परंतु रिक्त पदांमुळे कृषिसेवकांनाही या कामाला मर्यादा येत आहेत.

मात्र आता कृषी विभागाने ही अडचण सोडविण्यासाठी पावले उचलले असून, राज्यात तब्बल दोन हजार १०९ कृषिसेवकांची भरती करण्याचे निश्चित झाले आहे. यात नाशिक जिल्ह्यात ३३६ पदे भरली जाणार आहेत. (2109 krushi sevak recruitment in state maharashtra news)

शेतकऱ्यांना योजना समजावून सांगणे, पीक व्यवस्थापनाचे मार्गदर्शन करण्यासह कीटकनाशके, बियाणे, खतांचा सल्ला देण्यापासून तर योजनांची माहिती, कागदपत्रे आणि योजनांच्या लाभास निधी मिळवून देण्यापर्यंत सिंहाचा वाटा उचलणारा घटक म्हणजे कृषिसेवक! त्यातच शेती व कृषीशी संबंधित समस्या वाढल्याने कृषिसेवक शेतकऱ्यांचे जिवाभावाचे मित्रही बनत आहेत.

परंतु रिक्त पदांमुळे एका कृषिसेवकाकडे अनेक गावांचा कारभार असल्याने या कामालाही मर्यादा पडत होत्या. कृषिसेवकांच्या तब्बल दोन हजार ६३८ जागा रिक्त असल्याने अखेर कृषी विभागात शासनाने तब्बल साडेतीन वर्षांनंतर कृषिसेवक पदाची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात आठही विभागांत ही पदभरती करण्याचे आदेश कृषी विभागाने काढले आहेत. यामध्ये दोन हजार १०९ पदांसाठी ही भरती होईल. कृषिसेवकाच्या संदर्भाच्या जाहिरातीही प्रसिद्ध झाल्या असून, लवकरच अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होणार असून, अर्ज प्रक्रियेची सविस्तर माहिती कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

तीन वर्ष कंत्राटी नियुक्ती

गट ‘क’ संवर्गातील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे कृषिसेवक म्हणून सरळसेवेने भरली जाणार आहेत. राज्यात दोन हजार ६३८ पदे रिक्त असून, ८० टक्के म्हणजेच दोन हजार १०९ पदे भरण्यात येतील. कृषिसेवकांना १६ हजार रुपये प्रतिमहा एकत्रित मानधन देण्यात येणार असून, तीन वर्षांचा कालावधी संपल्यानंतर नियमित वेतनश्रेणीत नियुक्ती देण्यात येणार आहे.

बेरोजगारांना मिळणार संधी

कृषी पदवी व पदविका घेतलेले अनेक बेरोजगार असून, ते विविध कृषी कंपन्यांत कार्यरत आहेत. त्यांना आता शासकीय सेवेत नोकरीची संधी मिळणार आहे. या पदासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावे लागणार आहे.

अर्थात जाहिरात प्रसिद्ध झाल्या, मात्र अर्ज दाखल करण्यासंदर्भात स्वतंत्रपणे पुन्हा सूचना प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. अनुसूचित क्षेत्राबाहेरील आणि क्षेत्रातील प्रवर्गातील ही भरती होईल. कृषिसेवक पदासाठी खुल्या प्रवर्गासाठी कमाल मर्यादा ३८ वर्षे, तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४३ वर्षे आहे. (Krushi Sevak Bharti 2023)

…अशी होईल परीक्षा

अर्ज दाखल केल्यावर संगणक प्रणालीद्वारे ऑनलाइन वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात परीक्षा घेण्यात येणार आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व या विषयाची प्रत्येकी २० गुणांची, तर कृषीविषयक १२० गुण अशी २०० गुणांची परीक्षा होईल. यासाठी १४० वस्तुनिष्ठ आधारित प्रश्न असतील. भरतीसाठी मागासवर्गीय उमेदवारांना ९०० रुपये, अमागासवर्गीय उमेदवारांसाठी एक हजार रुपये परीक्षा शुल्क आहे.

“शेतकऱ्यांचा मित्र म्हणून कृषिसेवकांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत असून, शेतीविषयक अडीअडचणी व योजनांची माहिती कृषिसेवकांकडूनच मिळते. त्यामुळे रिक्त पदी भरती होऊन कृषिसेवक नियुक्त होणार असल्याने शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. विशेषतः कृषी पदविका व पदवीचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना यामुळे नोकरीची संधी मिळणार आहे. शासनाचा स्वागतार्ह निर्णय आहे.” – डॉ. दिनेश कुळधर, प्राचार्य, एसएनडी कृषी महाविद्यालय, बाभूळगाव

रिक्त पदे व भरतीची पदसंख्या

विभाग — रिक्त पदे — पदसंख्या

नाशिक — ४२० — ३३६

ठाणे — ३६८ — २९४

पुणे — २३५ — १८८

कोल्हापूर — ३१३ — २५०

अमरावती — २८४ — २२७

छत्रपती संभाजीनगर — २४५ — १९६

लातूर — २१३ — १७०

नागपूर — ५६० — ४४८

एकूण — २६३८ — २१०९

 

Leave a Comment