Dte Bharti Recruitment 2023 Best | तंत्रशिक्षण संचालनालया मध्ये लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी भरती, पात्रता 10वी पास आणि पदवीधर

Dte Bharti Recruitment 2023: नमस्कार मित्रांनो जे पदवीधर राशी सुशिक्षित आहेत. अशा उमेदवारांना नोकरीची एक सुवर्णसंधी हीच चालून आली आहे. तंत्रशिक्षण संचालनालयामध्ये लिपिक प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी ही भरती होणार आहे. या भरतीसाठी पात्रता काय लागणार आहे. कागदपत्रे व या भरतीचा अर्ज करण्याची तारीख व अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे. हे आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा लेख सविस्तर वाचा.

पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी, तंत्रशिक्षण  संचालनालयाचे अधिपत्याखालील विविध कार्यालयांमध्ये “गट क ” मधील लघुलेखक, वरिष्ठ लिपिक आणि प्रयोगशाळा सहाय्यक या रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

Dte Bharti Recruitment 2023

तंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत संचालनालय तसेच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ व विभागीय कार्यालयाच्या नियंत्रणाखालील विविध शासकीय संस्थांमध्ये गट क संवर्गातील वरील नमूद पदनामांची रिक्त पदे सरळ सेवेने भरतीसाठी अर्हताप्राप्त उमेदवारांकडून एकत्रीतरित्या Online पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

  • या भरतीसाठी 10वी पास तसेच कोणत्याही (Dte Bharti Recruitment 2023) शाखेतील पदवी अभ्यासक्रम प्राप्त उमेदवार ऑनलाईन अर्ज करण्यास पात्र आहेत.
  • सदर DTE Bharti 2023 करिता ऑनलाईन अर्ज 31/08/2023 पासून सुरू झाले आहेत. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2023 आहे.
  • पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचा आणि मगच अर्ज सादर करा.
  • उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/dted jun 23 / या Link वर Online पध्दतीने अर्ज सादर करावयाचे आहेत.
  • अर्जामध्ये चुकीची माहिती सादर करणा-या उमेदवारांना (Dte Bharti Recruitment 2023) सदर परीक्षेसाठी व यापुढील परीक्षा निवडीसाठी अपात्र ठरविण्यात येईल.

भरती प्रक्रीयेकरिता विहीत केलेल्या अटी व शर्ती

  • सदरच्या जाहिरातीमध्ये दर्शविलेल्या पदांच्या संख्येत कमी / जास्त बदल होण्याची शक्यता आहे.
  • काही अपरिहार्य कारणाने परीक्षा स्थगित झाल्यास त्याबाबत उमेदवाराला कोणताही दावा सांगता येणार नाही.
  • तसेच पदांची संख्या, परीक्षा स्थगित व रद्द करणे, अंशत: बदल करणे याबाबतचे सर्व अधिकार सहसंचालक, तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय, मुंबई, स्वतःकडे राखून ठेवीत आहेत.
  • भरती प्रक्रियेसंदर्भात उदभवणारे वाद, तक्रारी (Dte Bharti Recruitment 2023) इत्यादीबाबत सहसंचालक, तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय, मुंबई यांचा निर्णय अंतिम राहील.

तंत्रशिक्षण संचालनालयामध्ये लिपिक प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी ही भरतीचा अर्ज येथे करा 

Leave a Comment