Krushi Sevak Bharti : कोल्हापूर जिल्हा कृषी विभागात कृषीसेवक या पदासाठी नोकर भरती सुरु आहे यासाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि २१५ जागांसाठी हि भरती प्रक्रिया होणार आहे या भरती बद्दल सविस्तर माहिती आपण आज पाहणार आहोत.
मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील अत्यंत महत्वाचे क्षेत्र म्हणजे कृषी क्षेत्र.कृषी विभाग हा महाराष्ट्र सरकारचा पाया मानला जातो परंतु गेली अनेक वर्षांपासून कृषी विभागात नोकर भरती प्रक्रिया झालेली नाही आणि यामुळे कृषी विभागात अनेक जागा या रिक्त आहेत. परिणामी कृषी विभागातील अनेक कामे हि वेळेवर होत नाही आहेत आणि या सर्वांचा परिणाम कृषी विभागावर होत आहे.कृषी विभागातील अत्यंत महत्वाचे पद म्हणजे ‘कृषीसेवक
Krushi Sevak Bharti
कोल्हापूर जिल्ह्यात देखील आता मोठ्या प्रमाणावर कृषीसेवक या पदासाठी भरती निघाली असून यामध्ये २१५ जागा भरल्या जाणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये हि भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
सविस्तर माहिती:
भरतीचे नाव – कोल्हापूर जिल्हा कृषी विभाग भरती २०२३
विभाग – महाराष्ट्र कृषी विभाग
पदाचे नाव – कृषीसेवक
पदसंख्या-: २१५
नोकरी ठिकाण :- संपूर्ण कोल्हापूर जिल्हा
वेतनश्रेणी :- 16000-25000
अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन
पात्रता :
*अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर किंवा मंडळातून दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
*अर्ज करण्यासाठी उमेदवार हा 12 वी पास (Krushi Sevak Bharti) असावा किंवा कृषी क्षेत्रातील डिप्लोमा केलेला असावा.
*उमेदवार हा कृषी क्षेत्रातील पदवीधर असल्यास देखील अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा :
अराखीव (खुला) प्रवर्ग – 19 ते 38 वर्ष
राखीव (मागास) प्रवर्ग – 19 ते 43 वर्ष
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
शुल्क :
अमागास (खुला प्रवर्ग) – 1000 रु.
मागास प्रवर्ग – 900 रु.
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी Link – https://krishi.maharashtra.gov.in/
अशाच लेटेस्ट बातम्या आणि जॉब रिलेटेड (Krushi Sevak Bharti) अपडेट पाहण्यासाठी आमच्या वेबसाईट दररोज भेट द्या.